नाशिक - शहरात गेल्या ८ दिवसात २५० हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे. जुन्या नाशिक भागात प्रमुख्याने रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक शहराचे पोलीस आयुक्त आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या भागात संयुक्तिक जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या परिसरात मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी भेट दिल्या. त्यानंतर या भागात नव्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेली नवीन नियमावलीचा विचार आता केला जाणार आहे. त्यासोबतच प्रतिबंधित क्षेत्र ठरवताना अर्थचक्र कसे सुरू राहील याचा देखील विचार करण्याची जबाबदारी आता दोन्ही आयुक्तांनी घेतली आहे.