नाशिक -कोरोना महामारीच्या प्रादुर्भावासाठी वरदान ठरू पाहणाऱ्या लसीचा प्रचंड सावळा गोंधळ दिसून आला आहे. कळवणमध्ये कोव्हॅक्सिन लसीचा साठा रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. तर याच तालुक्यात लस न घेताही एका महिलेला प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व विषयावर प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनासाठी वरदान ठरू पाहणाऱ्या लसीकरणासाठी वेग देण्याचे आदेश केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने प्रशासनाला दिले आहे. त्या दृष्टिकोनातून लसीकरणासाठी वेग दिला जात आहे. 70 टक्के लसीकरण करून व करावे यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आजही संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे लसीकरणामध्ये प्रथम स्थानावर ती आहे. मात्र, आता काही कर्मचार्यांकडून या लसीकरण संदर्भात सावळा गोंधळ निर्माण केला जात आहे. याचे उदाहरण नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यात समोर आले आहे.
हेही वाचा -बुलडाण्याच्या डॉक्टरांनी 4 हजार 100 रुग्णांना जीवनदान
वीस कोव्हॅक्सिनच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्या -
कळवण तालुक्यात वणी रस्त्यावरील गोबापुर या गावाजवळ कोव्हॅक्सिन या लसीचा साठा हा रस्त्यावर फेकला गेल्याचे आढळून आले आहे. सुमारे 20 भरलेल्या बाटल्या या रस्त्यावर फेकल्या गेल्या तर काही बाटल्या या रस्त्यावरती फोडण्यात आल्याचे समोर आले. हा साठा बघितल्यानंतर त्या रस्त्यावरुन जाणारे कल्पेश जठार यांनी हा साठा गोळा करून तातडीने या गावच्या आशा सेविकांकडे दिल्या. त्यांनी तो साठा नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा केला आहे. मात्र, रस्त्यावर हा साठा आलाच कसा? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही मिळू शकले नाही. याबाबत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आणि कळवण प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा -नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
तरी लसीकरणाचा दिल्या गेल्याचा मेसेज येतो कसा?
कळवण तालुक्यातील नवी बेज येथे राहणाऱ्या भिमाबाई गोसावी या कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी शनिवारी 3 जुलैला लसीकरण केंद्रावर गेल्या. यावेळी त्यांना या केंद्रावर लसी नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या घरी गेल्यानंतर काही वेळातच त्यांना त्यांनी लस घेतल्या संदर्भातील मेसेज त्यांना मोबाईलवर आला. तसेच त्याबाबतचे प्रमाणपत्रही मोबाईलवर आले. त्यांनी तातडीने या संदर्भात कळवण येथील नवीबेज आरोग्य केंद्रात तक्रार केली आहे. कळवण तालुक्यातील या दोन्ही घटनांमुळे लसीकरणाचा मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ असल्याचे समोर आले आहे.