महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Unique Punishment : रस्त्यातल्या भांडणासाठी कोर्टाने दिली अनोखी शिक्षा, झाडे लावण्याचा दिला आदेश, 5 वेळा करावे लागणार नमाज पठण - Court orders brawl case

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील न्यायालयाने एका मुस्लिम व्यक्तीला रस्ता अपघातात झालेल्या भांडण प्रकरणी दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याला दोन झाडे लावण्याचे आणि 21 दिवस दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

Unique Punishment
भांडण प्रकरणातील दोषीला झाडे लावण्याचे कोर्टाचे आदेश

By

Published : Mar 1, 2023, 5:11 PM IST

Updated : Mar 1, 2023, 7:21 PM IST

धर्मेंद्र चव्हाण - वकील

नाशिक :मारहाणीच्या प्रकरणातील एका आरोपीला सुधारण्याची संधी देण्यासाठी, मालेगावच्या न्यायाधीशांनी त्यास 21 दिवस पाच वेळेस नमाज अदा करण्याची, तसेच दोन वृक्षारोपांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याची शिक्षा सुनावली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.


बऱ्याच खटल्यांमध्ये आरोपींना फाशी, सक्तमुजरी, जन्मठेप अशा शिक्षा होतात. मात्र, मालेगाव येथे मारहाण प्रकरणात दोषी असलेला रऊफ उमर खान या आरोपीला मालेगावचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश तेजवंतसिंह संधू यांनी अनोखी शिक्षा सुनावली. या आरोपीला 21 दिवस पाच वेळेस नमाज अदा करण्याची तसेच दोन वृक्षरोपांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीशांनी दिलेल्या निकालाची मालेगाव मध्ये चर्चा सुरू आहे.

काय होते प्रकरण :मालेगाव येथील सोनापूर मशिदीच्या गल्लीत 29 एप्रिल 2010 रोजी रिक्षाने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे रिक्षाचालक रऊफ खान व दुचाकी मालक शरीफ मजीद शेख यांच्यात वाद झाला होता. रऊफ याने तिघा मित्रांच्या मदतीने शरीफला मारहाण केली होती. या मारहाणी प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश संधू यांच्यासमोर झाली. पुरावे व साक्षीवरून आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध झाला. सरकारी पक्षातर्फे वकील जी.जी.पवार तर आरोपीच्या वतीने वकील एस.एस.निकम यांनी बाजू मांडली. त्यावर न्यायाधीश संधू यांनी अनोखी शिक्षा सुनावली.

अमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती :न्यायाधीश संधू यांनी कलम 3 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत आरोपीला यथोचित समजल दिली. आरोपी मुस्लिम असल्याने त्याने पुढील 21 दिवस दैनंदिन फझर, जोहर, असर, मगरिब, इशा अशा पाच वेळेची नमाज अदा करावी, तसेच सोनापूर मशीद परिसरातील रिकाम्या जागेवर दोन वृक्षरोपांची लागवड करून संगोपन करण्याची शिक्षा सुनावली. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी कृषी अधिकाऱ्यांची विशेष परिविधी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच या आदेशाची प्रत सोनापूर मशिदीच्या इमाम यांनाही पाठविण्यात आली आहे.

चांगला निकाल :यावर आरोपीला जेलमध्ये टाकण्यापेक्षा त्याला सुधारण्याची संधी देण्याचा जो निर्णय मालेगाव कोर्टाने घेतला आहे तो अतिशय चांगला आहे, न्यायव्यवस्थेत सुद्धा आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे वकील धर्मेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. न्यायदंडाधिकारी तेजवंत सिंग संधू यांनी २७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स कायद्यातील तरतुदींनुसार दंडाधिकार्‍यांना मुक्तता करण्याचे अधिकार दिले आहेत. सल्ल्याने किंवा योग्य इशाऱ्यानंतर दोषी ठरवून तो गुन्हा पुन्हा करू नये याची खात्री करा. सध्याच्या प्रकरणात न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ चेतावणी पुरेशी नाही आणि दोषीला त्याची शिक्षा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तो गुन्हा पुन्हा करू नये.

याप्रकरणी गुन्हा :महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील न्यायालयाने एका मुस्लिम व्यक्तीला रस्ता अपघातात झालेल्या भांडण प्रकरणी दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याला दोन झाडे लावण्याचे आणि 21 दिवस दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचे आदेश दिले आहेत. 30 वर्षीय दोषी रौफ खान याच्यावर 2010 मध्ये एका व्यक्तीला रस्ता अपघातात झालेल्या भांडणातून मारहाण केल्याप्रकरणी, दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :Mumbai Crime News: नूडल्सचे आमिष दाखवून केले तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; 42 वर्षीय शेजाऱ्याला अटक

Last Updated : Mar 1, 2023, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details