नाशिक - व्हॅलेंटाईन डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. मात्र, ह्या दिवशी नाशिकच्या जोडप्यांनी एकत्र येत वेगवेगळे व्यायाम प्रकार करत आरोग्य संदेश देत हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. फोनएक्स हेल्थकेअर आणि आयरोन स्पोर्ट आयोजित ह्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जोडपे सहभागी झाले होते.
आरोग्याचा संदेश देत नाशिकच्या जोडप्यांनी साजरा केला व्हॅलेंटाईन डे स्पर्धेत केले विविध प्रकारच्या व्यायाम
दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. मात्र, नाशिकच्या जोडप्यांनी विविध प्रकारच्या व्यायामाचे स्पर्धेत सहभागी होत ह्या दिवसाची सुरवात अनोख्या पद्धतीने केली. ह्यात स्पर्धेत डॉक्टर, खेळाडू, वकील, उद्योजक सपत्निक सहभागी झाले होते.
दिवसातून 45 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे
धकाधकीच्या जीवनात प्रत्येकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ह्यासाठी सर्वांनी आपल्या शरीरासाठी दिवसातून 45 मिनिटे देणे गरजेचे आहे. मग ह्यावेळात तुम्ही व्यायाम शाळेत जाऊ शकता अन्यथा चालू शकता. आजचा दिवस आमच्या साठी खूप वेगळा राहिला. अनेकदा जोडप्यांपैकी एक जण आरोग्याबाबत दक्ष असतो. मात्र, आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघे एकत्र आल्याचा आनंद वेगळा आहे.आम्ही सगळ्या स्पर्धेत भाग घेतला. ह्यात आम्हाला आमची शारीरिक क्षमता लक्षात आली, असे मत स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी व्यक्त केले आहे.