महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंधराशे फुट दरीत कार कोसळल्याने दाम्पत्य जागीच ठार; नाशिकमधील घटना - nashik accident

मुल्हेर (बागलाण) येथील व्यापारी रामजीवन मुरलीधर शर्मा (वय-४८) आपली पत्नी पुष्पा शर्मा (वय-४३) हे बुधवारी रात्रीच्या सुमारास साल्हेर किल्ल्यानजीक असलेल्या हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. यावेळी झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

nashik accident
पंधराशे फुट दरीत कार कोसळल्याने दाम्पत्य जागीच ठार; नाशिकमधील घटना

By

Published : Mar 20, 2020, 2:14 AM IST

नाशिक - बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल चिकाराजवळील 1500 फुट खोल दरीत चार चाकी कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात जोडपे जागीच ठार झाले. मुल्हेर (बागलाण) येथील व्यापारी रामजीवन मुरलीधर शर्मा (वय-४८) आपली पत्नी पुष्पा शर्मा (वय-४३) हे बुधवारी रात्रीच्या सुमारास साल्हेर किल्ल्यानजीक असलेल्या हॉटेलवर जेवणासाठी गेले होते.

मुरलीधर शर्मा (वय-४८) , पत्नी पुष्पा शर्मा

रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या सुमारास जेवण आटोपून आपल्या तवेरा कारने मुल्हेरकडे मागारी येत असताना, हॉटेलनजीकच त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट पंधराशे फुट दरीत कोसळली. गुजरात राज्याच्या हद्दीत डांग जिल्ह्यातील चिंचलीच्या घनदाट जंगलात कारसह दोघे अडकले होते. घटनेचे वृत्त कळताच मुल्हेर येथील व्यापारी वर्ग तसेच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जंगलात शोध कार्य सुरू केले. यावेळी शर्मा दाम्पत्याचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ही दुर्घटना गुजरातच्या जंगलात घडल्यामुळे तत्काळ गुजरातच्या पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. आज सकाळी गुजरात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाहणी करण्यात आली. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुपारी उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरू होते.

हॉटेल नव्हे मृत्यूचा सापळा..

गेल्या चार वर्षांपासून साल्हेर किल्ल्यालगत असलेल्या गुजरात सीमेवरील डोंगरावर अनाधिकृत हॉटेल राजरोस सुरू आहे. गेल्यावर्षी सटाणा येथील युवक देखील दरीत कोसळला होता. मात्र, सुदैवाने झाडांमध्ये अडकल्याने तो बचावला. याबाबत पोलीस आणि वन विभागकडे देखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही दुर्घटना घडल्याने ग्राहकांसाठी ते हॉटेल मृत्यूचा सापळा ठरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details