महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'किसान रेल्वेच्या माध्यमातून कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळेल' - country's first kisan rail

किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून, या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

किसान रेल्वे
किसान रेल्वे

By

Published : Aug 7, 2020, 2:43 PM IST

नाशिक -देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. नाशिकची ही निवड सार्थ निवड असून किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून, या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने आज देवळाली ते दानापूर येथे सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या किसान रेल्वेचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे मंत्री पियूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. भारती पवार, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, आमदार सरोज आहिरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात अधिक प्रगत असलेल्या नाशिकमधून आज पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिकची निवड ही अत्यंत योग्य निवड आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्यात कांदा पिकाचे उत्पादन अधिक होते, मात्र, बऱ्याच वेळा भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरतात. तसेच शेतकरी आत्महत्या देखील मोठ्या प्रमाणात होतात. अशा वेळी या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला, तर शेतकरी आत्महत्या कमी होतील यात शंका नाही, असे भुजबळ म्हणाले.

केंद्र सरकारने सुरू केलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाचा फायदा नाशिक जिल्ह्याला अधिक होईल. देशात अनेक किसान रेल्वे सुरू व्हाव्यात, या माध्यमातून देशातील विविध भाग जोडले जातील आणि शेतमालाचा पुरवठा होईल. तसेच देशातील विविध भागातील कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही भुजबळ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details