नाशिक -गेल्या दोन दिवसांत पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा चांगल्याच सतर्क झाल्या आहे. यातच नाशिक जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. जिल्ह्याच्या वेशीपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने आता शहरात येणाऱ्या वाहनांची महामार्गांवर तपासणी सुरू केली आहे.
नाशिकच्या वेशीवर कोरोना रोखणार : टोलनाक्यांवर प्रवाशांची तपासणी, तहसिलदारही रस्त्यावर उतरून सक्रिय शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले असून टोल नाक्यावर सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर वाहनांच्या संख्येत 35 ते 40 टक्के घट झाली आहे.
पुण्याहून नाशिकला आणि मुंबईहून नाशिकला येणाऱ्या प्रवाशांची टोलनाक्यांवर तपासणी करून त्यांना शहरात सोडले जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले आहे. आज पासून हे पथक शहराच्या हद्दीवर असणाऱ्या सर्वच टोलनाक्यांवर कार्यरत झाल्याचे पाहायला मिळाले. वाहनांमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये संशयित नागरिक आढळल्यास त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जात आहे. तर, उर्वरित नागरिकांची माहिती घेऊन त्यांना प्रबोधनाच्या सूचना केल्या जात आहे.
हेही वाचा - Coronavirus : माळढोक अभयारण्य पर्यटकांसाठी बंद, सोलापुरातील उद्यानेही 31 मार्चपर्यंत बंद
हेही वाचा - #CORONA : मशीद बंद ! कॅम्प भागातील इराणी इमाम वाडा मशीद ट्रस्टचा निर्णय