येवला(नाशिक) - गेल्या आठ दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून न आल्याने येवला कोरोना मुक्त झाल असे वाटत होते. मात्र काही दिवसातच तालुक्यातील कानडी येथील एका 24 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित तरुण रुग्ण हा एका गुन्ह्यातील आरोपी असून तो येवला शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. या आरोपीची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यासाठी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने पोलीस विभाग, आरोग्य विभागासह परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त येवल्यात आढळला बाधित रुग्ण - Nashik corona news
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने तालुका कोरोनामुक्त झाला, असे वाटत होते. मात्र तालुक्यात पुन्हा एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
येवल्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळला
शुक्रवारी येवला शहरातील महिलेचा घेतलेला स्वॅब प्रलंबित असल्याने येवलेकरांची धाकधूक वाढली आहे. येवल्यात एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर तालुक्यातील रुग्णसंख्या 33 वर जाऊन पोहोचली होती. यातील सर्वच्या सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतलेले होते. त्यामुळे येवला शहर व तालुका कोरोनामुक्त झाला होता. मात्र पुन्हा बाधित रुग्ण आढळल्याने येवलेकरांची चिंता वाढली आहे.