खामगाव पाटी येथे नाकेबंदी करत प्रवाश्यांची कोरोना चाचणी; 2 जण पॉझिटिव्ह - nashik latest corona news
नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांमधील नागरिकांची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात येत असताना त्यात दोन जण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांना येवल्यातील बाभूळगाव येथे विलगीकरण करण्यात आले आहे.
corona test
येवला (नाशिक) - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या संख्येवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात येत आहे. बाहेरील गावांमधून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य विभागाकडून रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.
Last Updated : May 21, 2021, 12:00 PM IST