नाशिक- जिल्ह्यातील येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. बाजार समित्यांच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे, अशा शेतकऱ्यांनाच बाजार समितीत प्रवेश देण्यात आला आहे.
येवल्यात बाजार समित्या सुरु; शेतकऱ्यांची प्रवेशद्वारावर कोरोना तपासणी - येवला लेेटस्ट न्यूज
बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह असेल तरच बाजार समितीत प्रवेश दिला जात आहे. या गोष्टीचा येवला प्रहार संघटनेच्यावतीने निषेध करण्यात येत आला.
शेतकऱ्यांचा कोरोना चाचणी
नाशिक जिल्ह्यातील कडक टाळेबंदी आजपासून शिथिल करण्यात आली असून कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आजपासून सुरू झाल्या आहेत. यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घेऊन आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे, अशाच शेतकऱ्यांना बाजार समितीत प्रवेश दिला जात आहे.
प्रहारकडून निषेध
बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह असेल तरच बाजार समितीत प्रवेश दिला जात आहे. या गोष्टीचा येवला प्रहार संघटनेच्यावतीने निषेध करण्यात येत आला. शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी केला आहे.