नाशिक - कोरोना विषाणुने चीनसह जगभरात थैमान घातले असतानाचा त्याची झळ आता भारतालाही बसली आहे. हा विषाणू सक्रीय असलेल्या देशांमधून परतलेल्या ८ महाराष्ट्रीयन लोकांपैकी एकामध्ये या विषाणुची लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण - कोराना विषाणू
मुळचा चंद्रपूरचा असलेला हा व्यक्ती 26 फेब्रुवारीला इटलीहून भारतात आला आहे. मायदेशी परतल्यानंतर झालेल्या आरोग्य चाचणीत कोरोनाची लक्षणे आढळून न आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतर ४ दिवसांनी त्याच्यात ताप, खोकला आणि दम लागणे, ही कोरोनाची लक्षणे आढळून आली.
हेही वाचा -तृतीयपंथींयासाठी अक्षय कुमारचे मोठे पाऊल, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
मुळचा चंद्रपूरचा असलेला हा व्यक्ती 26 फेब्रुवारीला इटलीहून भारतात आला आहे. मायदेशी परतल्यानंतर झालेल्या आरोग्य चाचणीत कोरोनाची लक्षणे आढळून न आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतर ४ दिवसांनी त्याच्यात ताप, खोकला आणि दम लागणे, ही कोरोनाची लक्षणे आढळून आली. या रुग्णावर सध्या नाशकातील जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. त्याच्या घशाचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच उपचारांची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.