नाशिक -जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी 189 नवे रुग्ण आढळूले. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 62 वर पोहोचली आहे. यात नाशिक शहरातील 113 तर ग्रामीण भागातील 59 बाधितांचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 234 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील 2 हजार 230 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 598 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -अनलॉक-2 साठी गाइडलाइन जारी; कंटेन्मेंट झोन वगळता काय सुरू राहणार काय राहणार बंद, जाणून घ्या...
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण -
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 76,चांदवड 8, सिन्नर 44, देवळा 02, दिंडोरी 21, निफाड 58, नांदगांव 09, येवला 32, त्र्यंबकेश्वर 17, कळवण 1, बागलाण 13, इगतपुरी 20, मालेगांव ग्रामीण 13 असे एकूण 314 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर सुरगाणा, पेठ या दोन तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 97, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 150 तर जिल्ह्याबाहेरील 37 असे एकूण 1 हजार 598 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 हजार 62 रुग्ण आढळले आहेत. तर मृतांमध्ये नाशिक ग्रामीण 45, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 104, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 74 आणि जिल्हा बाहेरील 11 अशा एकूण 234 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.