नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 7 ऑगस्ट रोजी 24 तासात जिल्ह्यात कोरोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला. तर 771 नवे रुग्ण आढळून आले.
मृत्यू झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील 22 जणांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 578 जणांचा बळी गेला. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येबरोबरच वाढणारी रुग्णसंख्या ही प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 771 नवीन रुग्ण उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झाले. यात नाशिक शहरातील 499 तर ग्रामीण भागामधील 234 जणांचा समावेश आहे.
कोरोना प्रसार आटोक्यात येणाऱ्या मालेगाव शहरात गत आठवड्यात दिवसातील उच्चांकी 35 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 523 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्याचे प्रशासनाने सांगितले. सद्यस्थितीत जिल्ह्यात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये 4 हजार 565 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रॅपिड अँटीजेन टेस्टमुळे वाढत आहे रुग्णसंख्या..