महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये कोरोनाचे 399 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण, आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू - Nashik Corona Positive Cases

जिल्ह्यात कोरोनाचे 399 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत आहे. आज मालेगावमध्ये एकाच वेळी 10 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 461 वर जाऊन पोहचली आहे. 89 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मात्र, समाधानकारक बाब म्हणजे 973 जण कोरोनामुक्त झाले आहे.

नाशिक कोरोना न्यूज
नाशिक कोरोना न्यूज

By

Published : Jun 6, 2020, 2:29 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचे 399 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत आहे. आज मालेगावमध्ये एकाच वेळी 10 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 461 वर जाऊन पोहोचली आहे. 89 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मात्र, समाधानकारक बाब म्हणजे 973 जण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असला तरी वेळेवर योग्य उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. तर, 89 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या काही व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि त्यात कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. मात्र, असे असले तरी नाशिकमध्ये अद्याप कोरोना विषाणूचा 'कम्युनिटी स्प्रेड' झाला असून जेवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. ते सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील आजपर्यंतची कोरोनाची परिस्थिती

एकूण कोरोनाबाधित रुग्ण - 1 हजार 461
कोरोना मुक्त झालेल्या व्यक्ती - 973
उपचार घेत असलेले कोरोना बाधित रुग्ण - 399
एकूण मृत्यू - 89
शहरातील अ‌ॅक्टिव्ह रुग्ण - 209
मालेगाव शहरातील अ‌ॅक्टिव्ह रुग्ण - 106
नाशिक ग्रामीण भागातील अ‌ॅक्टिव्ह रुग्ण - 68
नाशिक जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 16

ABOUT THE AUTHOR

...view details