महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरी : खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केल्याचं प्रशासनाला कळवा, आरोग्य विभागाचे आवाहन

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यात सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोणत्याही नागरिकांनी खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केल्यास प्रशासनाला कळवण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

dindori
दिंडोरीत खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केल्याच प्रशासनाला कळवा

By

Published : Jun 8, 2020, 3:35 PM IST

दिंडोरी (नाशिक) - जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झाला आहे. दिंडोरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी ९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी दिली.

हेही वाचा -नाशिक शहरात एकाच दिवसात वाढले 61 कोरोना रुग्ण; जिल्ह्यात मृत्यूची संख्या 97 वर

काही दिवसांपूर्वी जानोरी गावातील एक ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून गाव सील करून निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या गावात एकही नवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. तसेच आंबेदिंडोरी-ढकांबे रोड येथील एक रुग्ण प्रकृती अस्वस्थतेमुळे उपचारासाठी नाशिकला गेला होता. त्याने तिथेच कोरोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आढळला होता. त्याच्यावर उपचार सुरू असून संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

हेही वाचा -दिंडोरी तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले

दिंडोरी तालुक्यात सध्या ५ कंटेनमेंट झोन आहेत. त्यातील तीन झोनमधील नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून तिथे पुन्हा बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोना परिस्थिती सध्यातरी आटोक्यात आहे. तालुक्यातील नागरीकांनी खासगी रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिला असल्यास त्यांनी प्रशासनाला कळवावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details