महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन् 'नाशिक कावडी'वर थिरकले कोरोनाबाधित; व्हिडिओ व्हायरल - मालेगाव कोरोना बाधित थिरकले

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 3 लाखांच्यावर गेली आहे. यातच अनेक जण कोरोनाची भीती दूर व्हावी म्हणून अनेक संकल्पना राबवताना दिसून येत आहेत.

corona patients malegaon
कोरोनाबाधित मालेगाव

By

Published : Jul 21, 2020, 10:28 AM IST

मालेगाव (नाशिक) - येथील एका कोविडसेंटरमध्ये कोरोनाची भीती दूर करण्यासाठी कोरोनाबाधितांनी चक्क 'डान्स' केल्याचा प्रकार समोर आला आहे. मसगा कॉलेजमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 3 लाखांच्यावर गेली आहे. यातच अनेक जण कोरोनाची भीती दूर व्हावी म्हणून अनेक संकल्पना राबवताना दिसून येत आहेत. यात विलगिकरण कक्षात दाखल झालेल्या संशयितांनी कुठे भिंती रंगवण्याचे काम केले तर कुठे विरंगुळा करण्यासाठी कोरोना संशयितांनी खेळ खेळले.

मात्र, नाशिक जिल्ह्यातील सुरुवातीला कोरोनाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथील मसगा कॉलेजमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये संशयित रुग्णांनी कोरोनाची भीती घालवण्यासाठी मनसोक्त डान्स केला. यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा -शिवसेनेच्या 'या' आमदाराला कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details