महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 6, 2020, 8:48 AM IST

ETV Bharat / state

येवल्यात 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले; ग्रामीण रुग्णालयातील 10 जणांचा समावेश

आरोग्य यंत्रणेतही कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. येवल्यापाठोपाठ कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

corona patient number increased in yevla by sixteen
येवल्यात 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले; ग्रामीण रुग्णालयातील दहा जणांचा समावेश

येवला(नाशिक)- नाशिक जिल्हयातील मालेगाव पाठोपाठ आता येवल्यातील कोरोनाबाधित रुणाच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी रात्री 16 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका अशा दहा जणांचा समावेश आहे.आरोग्य यंत्रणेतही कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

16 कोरोनाबाधितांमध्ये एक पोलीस कर्मचारीही कोरोनाबाधित आढळला आहे. कोरोनाबाधितांमध्ये 10 पुरुष ,5 महिला तर एका लहान मुलाचा समावेश आहे. शहरात एकूण कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 25 वर जाऊन पोहचली आहे.

येवला शहरात नंतर आता ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला असून तालुक्यातील पाटोदा,अंगणगाव,गवंडगाव,या गावांमध्ये एक-एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला आहे.एकाच दिवशी 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने येवलेकर मोठ्या प्रमाणात धास्तावले आहे

ABOUT THE AUTHOR

...view details