महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; जिल्ह्यात रुग्णसंख्या 1370 वर - Nashik corona update

नाशिक शहर,मालेगाव आणि आता ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97 वर जाऊन पोहचलीय. यातील सर्वाधिक रुग्ण मनमाड, येवला भागातील आहेत.

nashik corona update
नाशिक कोरोना अपडेट

By

Published : Jun 4, 2020, 4:53 PM IST

नाशिक- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा 1370 वर पोहचला असून, 902 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक शहर,मालेगाव आणि आता ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 97 वर जाऊन पोहचलीय. नाशिकच्या मनमाड, सिन्नर, इगतपुरी, निफाड, नांदगाव, येवला भागात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.यातील सर्वाधिक रुग्ण हे मनमाड,येवला या भागात आढळून आले आहेत.

नाशिक शहरात देखील कोरोनाबाधितांची संख्या 169 वर जाऊन पोहचली आहे.मालेगाव मध्ये सद्यस्थितीला 107 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 1370 जण कोरोनाबाधित झाले असून 902 कोरोनामुक्त झालेत. 77 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

एक नजर टाकूया ग्रामीण भागात कुठे किती रुग्ण आहेत

येवला- 18

नांदगाव-मनमाड-38

सिन्नर-18

चांदवड-2

देवळा-2

निफाड-8

बागलाण-4

इगतपुरी-2

दिंडोरी-1

मालेगाव ग्रामीण-4

ABOUT THE AUTHOR

...view details