महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'इटलीचे पंतप्रधान रडकुंडीस आलेत; आपल्याकडे असं होऊ नये, म्हणून घराबाहेर पडू नका' - Don't go out of home

कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सध्या संचारबंदीला चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. तरिही नागरिकांनी केवळ गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

छगन भुबळ नाशिक
छगन भुबळ

By

Published : Mar 25, 2020, 10:36 AM IST

नाशिक - कोरोना विषाणूमुळे अमेरिकेसारखा देश रडतोय, चीन हतबल झाला आहे. आर्थिकदृष्ट्या इटली सक्षम असतानाही इटलीचे पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी आले. ही परिस्थिती आपल्याकडे होऊ नये, यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वजण करत आहोत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

छगन भुबळ यांचे नागरिकांना आवाहन....

हेही वाचा...पुढील २१ दिवस हाताळता आले नाहीत तर देश २१ वर्षे मागे जाईल - मोदी

कोरोना विषाणूसंदर्भात निफाड, येवला येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 'नागरिकांनी सुद्धा संचारबंदी काळात घराबाहेर पडू नये. तसेच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना एकाच व्यक्तीने जावे, संबंधित दुकानांवर जास्त गर्दी होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. कोरोना विषाणूची भीती न बाळगता, सतर्कतेने, स्वच्छता ठेवून व एकमेकांपासून लांब राहून या परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे' असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details