मनमाड (नाशिक) -रेल्वेच्या ब्रिटशकालीन कारखान्यातही कोरोनाचा प्रवेश झाला आहे. मनमाडमधील केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यातील सुमारे 10 ते 12 कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आज कारखाना बंद ठेवण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मनमाडमध्ये ब्रिटिशकालीन केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना आहे. रेल्वेचे ब्रिज बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्टसह इतर साहित्य तयार होते. या ठिकाणी हजारो कर्मचारी काम करतात. मागील वर्षी कोरोना वाढला असताना या कारखान्यात दोन पाळ्यांमध्ये काम केले जात होते. यानंतर पुन्हा नियमितपणे काम सुरू करण्यात आले. मात्र, या ठिकाणी कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आजपासून कारखाना बंद करण्यात आला. संपूर्ण कारखाना सॅनिटायझेशन करण्याचे काम सुरू आहे.