दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे तालुक्यातील प्रशासन अगोदरच हैराण झाले आहे. प्रशासनाकडून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. त्यातच पालखेड औद्योगिक वसाहतीतील हायमेडिया कंपनीततील 44 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे. तालुका वैद्यकीय आधिकारी सुजित कोशीरे यांनी याबबात माहिती दिली आहे.
दिंडोरी तालुक्यात औषधे बनवणाऱ्या अनेक कंपन्या असून हायमेडिया ही कंपनी पीपीई कीट बाबत काम करते. पहिल्या कडक लॉकडॉऊनमध्ये देखील कंपनीचे काम निर्धास्तपणे सुरू होते. या कंपनीतील 44 अधिकारी व कर्मचारी आता कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त प्रशासनाला देण्यात आले. या कंपनीत पूर्वीपासून खबरदारी घेण्यात न आल्याने इतकी मोठी संख्या कोरोनाग्रस्तांची झाली असून कंपनी प्रशासनाला कोरोनाबाबत व्यवसाय मिळाल्याने त्यांनी कोरोना नियमाकडे दुर्लक्ष केल्याने कामगार बाधित झाल्याचे कामगारांनी खासगीत बोलताना सांगितले.