महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 19, 2021, 3:11 PM IST

Updated : Oct 19, 2021, 3:29 PM IST

ETV Bharat / state

कोरोनाने आपले स्वरूप अजून बदललेले नाही.. अजूनही डेल्टा व्हायरसच - आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाने  आपले स्वरूप अजूनही बदललेला नसून डेल्टा वायरसच आहे. त्यामुळे अजून काळजी करण्याचे कारण नसले तरीदेखील लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

Rajesh Tope
Rajesh Tope

येवला (नाशिक) - कोरोनाने आपले स्वरूप अजूनही बदललेला नसून डेल्टा वायरसच आहे. त्यामुळे अजून काळजी करण्याचे कारण नसले तरीदेखील लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जालना येथून नाशिककडे जात असताना येवला येथे थांबले असता त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असून येवल्यात रुग्ण वाढत असल्याचे विचारले असता. नक्कीच येवला तालुक्यालगत नगर जिल्हा असल्याने निश्चितच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो कारण की येवल्याचे लोक कोपरगावला जातात कोपरगावचे येवला येथे येतात त्यामुळे निश्चित त्याचा परिणाम होऊ शकतो.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

दरम्यान सोमवारी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले होते की, टास्क फोर्सने सांगितल्या प्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही. त्याचा मोठा परीणाम होणार नाही, असे अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आले आहे. अमेरिका, युरोपमध्ये तिसरी लाट आली पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. मात्र, लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा -महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण मोठे आव्हान - राजेश टोपे

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने 'मिशन कवचकुंडल' अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Last Updated : Oct 19, 2021, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details