येवला (नाशिक) -तालुक्यातील १२४ पैकी १२३ गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. मात्र कौटखेडे हे गाव याला अपवाद ठरले आहे. दुसऱ्या लाटेत सुध्दा येवला तालुक्यातील कौटखेडा गाव कोरोनामुक्त आहे. त्यामुळे या गावाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
दुसऱ्या लाटेतही गाव कोरोनामुक्त
कोरोना संसर्ग आपल्या गावात येऊ नये, म्हणून अनेक गावांनी विविध उपाययोजना आखल्या आणि कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखले. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालूक्यातील कौटखेडा या गावने अशाच काही उपाययोजना केल्या आणि गावात कोरोनाचा शिरकावच होऊ न दिल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुध्दा हे गाव कोरोनामुक्त असल्याचे दिसून आले आहे.
गावकऱ्यांचा सहकार्य
कोरोनाचा दुसरी लाट आली आणि नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अनेक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागात दिसून आला. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघ याला अपवाद ठरला नाही. येवला तालुक्यातील १२४ पैकी १२३ गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. मात्र कौटखेडे हे गाव त्याला अपवाद ठरले. तळवाडे गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या ६०० लोकसंख्येच्या कौटखेडे गावाने गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून गावकऱ्यांसाठी विविध उपाययोजना आखले. सरपंच, उपसरपंच व आरोग्य विभागाला गावकऱ्यांची साथ दिली, त्यामुळे हे गाव दुसऱ्या लाटेत देखील कोरोनामुक्त राहिले आहे. विशेष म्हणजे मागिलवर्षी सुध्दा या गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.
हेही वाचा-माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सर्वात विश्वासू खासगी सचिव राम खांडेकर यांचे निधन