मालेगाव(नाशिक)- मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयास 128 रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून त्यातील 27 रिपोर्ट मालेगावातील पॉझिटिव्ह रुग्णांचे आले आहेत. मालेगावात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 324 झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या 360 वर पोहोचली आहे. मालेगावात 12 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; जिल्ह्यातील 360 पैकी 324 रुग्ण मालेगावतील - नाशिक
मालेगावातील ज्यानागरिकांना सर्दी, ताप, खोकला, घसा दुखी त्रास होत असेल तर त्यांनी न घाबरता वेळीच उपचार घेतला तर कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होण्यास नक्की मदत होईल, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.नाशिक ग्रामीण मध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. मालेगावात कोरोनाबाधित रुग्ण वाढण्यासह मृतांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही मालेगाव मधील नागरिक अगदी शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसून येत आहे. ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, घसा दुखी त्रास होत असेल तर त्यांनी न घाबरता वेळीच उपचार घेतला तर कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होण्यास नक्की मदत होईल, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत मालेगावात जवळपास 50 च्यावर पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 360 वर पोहोचला असून नाशिक शहरातील 16 तर नाशिक ग्रामीण मधील 17 रुग्णांचा समावेश आहे. मालेगाव पाठोपाठ नाशिक ग्रामीण मधील कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलीय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी देखील तितक्याच सतर्कपणे प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे घरी राहा सुरक्षित रहा आणि कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले आहे.