दिंडोरी (नाशिक) : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे अध्यक्षतेखाली वणी येथे कोविड परिस्थिती तसेच आरोग्य सेवेच्या कामकाजाची आढावा बैठक पार पडली. कोरोनाशी मुकाबला करताना सर्व शासकीय यंत्रणेने समन्वय ठेवत काम करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी कोविड 19 संदर्भात केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे यांनी विलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटरसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची चर्चा केली.
कोरोनाशी लढताना शासकीय यंत्रणेने समन्वय ठेवून काम करा : विधानसभा उपाध्यक्ष - NASHIK COVID 19 CASES
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली वणी येथे कोविड परिस्थिती तसेच आरोग्य सेवेच्या कामकाजाची आढावा बैठक पार पडली. कोविडशी मुकाबला करताना सर्व शासकीय यंत्रणेने समन्वय ठेवत काम करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
![कोरोनाशी लढताना शासकीय यंत्रणेने समन्वय ठेवून काम करा : विधानसभा उपाध्यक्ष narahari zirwal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:36:30:1595124390-mh-nsk-governmentagenciesshouldcoordinatetocombatcovid-19narharijirwal-10030-18072020212343-1807f-1595087623-1092.jpg)
प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनंत पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे आदींसह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी कोशिरे यांनी जनतेचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. तसेच कोविडच्या लढ्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले. तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणेतील कर्मचारी, विशेषतः आरोग्य कर्मचारी यांना दिंडोरी येथे ठेवावे अन्य ठिकाणी पाठवू नये, असेही त्यांनी सांगितले.