नाशिक- कुचबिहार करंडकासाठी महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघात नाशिकच्या श्रेयस वालेकर याची निवड झाली आहे. मागील दोन वर्षांपासून श्रेयसने सातत्याने चांगली कामगिरीने केल्याने, त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
शिक्षणासाठी पुण्यात वास्तवाला असणाऱ्या श्रेयसने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या १६ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सद्या तो पुण्याच्या पीवायसी क्लबकडून खेळतो.
कुचबिहारी करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला सामना २१ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेश विरुध्द होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा संघ झारखंड, गुजरात, हैदराबाद, विदर्भ, केरळ, कर्नाटक आणि मुंबई विरुद्ध दोन हात करणार आहे.