नाशिक:नाशिक शहरातील गांधीनगर कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनचा दीक्षांत सोहळा पार पडला आहे. कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनमध्ये हवाई प्रशिक्षण दिले जाते. कॅटची 38 वी तुकडी देशसेवेत दाखल झाली. या आर्मीकडून हवाई चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. हे प्रात्यक्षिक बघतांना युद्धभूमीवर घडणाऱ्या प्रसंगाची प्रचिती उपस्थितांना आली. त्यानंतर उत्कृष्ट कॅरेट, उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट वैमानिकाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिस्तबद्ध पडणारे पावले अभिमानाने भरून आलेला उर, देशसेवेसाठी सज्ज झाले तरुण असं वातावरण याप्रसंगी दिसून आले होते.
चित्तथरारक कसरती:दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांची मन जिंकली. हवेत करण्यात आलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत. शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, एकाचवेळी 4-4 हेलिकॉप्टरवर हल्ला करून जाणे, अशी हृदयाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते 38 वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. एक नायजिरीयन अधिकाऱ्यासहित 32 अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.