नाशिक - गेल्या अनेक दिवसांपासून त्रंबकेश्वर नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अगदी तुटपुंज्या मनधनात हे कर्मचारी काम करीत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासन मागण्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी 'अर्धदफन' आंदोलन केले.
कंत्राटी सफाई कामगारांचे 'अर्धदफन' आंदोलन, मानधनवाढीची मागणी - 'अर्ध दफन' आंदोलन नाशिक
अवघ्या 3 ते 4 हजारांत काम करा अन्यथा घरी बसा, अशाप्रकरच्या सूचना सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अवघ्या 3 ते 4 हजारांत काम करा अन्यथा घरी बसा, अशाप्रकरच्या सूचना कंत्राटीसफाई कर्मचाऱ्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात आम्ही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र, आम्हाला इतक्या कमी मानधनात काम करावे लागत आहे. या रकमेतून आमच्या कुटुंबाचा गाडा चालवणे शक्य होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी 'अर्धदफन' आंदोलन केले. या आंदोलनात प्रहार संघटनेनेही सहभागी होत संबंधित कंत्राटदाराचा आणि त्यात हस्तक्षेप करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध केला.
हेही वाचा-देशातील महत्वाची मंदिरे दर्शनासाठी खुली.. शिर्डीला प्रतीक्षा राज्य सरकारच्या आदेशाची