महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन कंटेनरमध्ये अपघात, एक कंटेनर जळून खाक - yeola manmad road

येवला-मनमाड महामार्गावर सावरगाव जवळ पाईप घेऊन जाणारा कंटेनर व मालवाहू कंटेनरमध्ये अपघात झाला.

कंटेनरला लागलेली आग

By

Published : Dec 25, 2019, 4:54 PM IST

Updated : Dec 25, 2019, 9:32 PM IST

नाशिक- येवला-मनमाड महामार्गावर सावरगाव जवळ पाईप घेऊन जाणारा कंटेनर व मालवाहू कंटेनरमध्ये अपघात झाला. यात पाईप असणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


कंटेनरला लागलेल्या आगीचे मोठे लोळ दिसत असल्याने जवळपासच्या नागरिकांनी धाव घेतली. कंटेनरने पेट घेतल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत पाईप असलेला कंटेनर जळून खाक झाला होता.

हेही वाचा - नाशिकची मिसळ सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले कौतुक

Last Updated : Dec 25, 2019, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details