महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा अध्यक्ष कोणाला करायचे हे काॅंग्रेस ठरवेल - छगन भुजबळ - nashik chhagan bhujbal news

सत्ता वाटपाचे धोरण ठरले असून कोणाला कसे बसवायचे हे काॅंग्रेसने ठरवावे, अशी प्रतिक्रिया अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

congress will decide who will be the speaker of  assembly said chhagan bhujbal in nashik
विधानसभा अध्यक्ष कोणाला करायचे हे काॅंग्रेस ठरवेल - छगन भुजबळ

By

Published : Feb 5, 2021, 6:21 PM IST

नाशिक -कोणाला प्रदेशाध्यक्ष करायचे आणि कोणाला विधान परिषदेचे अध्यक्षपद द्यायचे, हा निर्णय काॅग्रेस पक्ष घेईल. तसचे सत्ता वाटपाचे धोरण ठरले असून कोणाला कसे बसवायचे हे काॅंग्रेसने ठरवावे, अशी प्रतिक्रिया अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

सर्व सेट झाले असताना नाना पटोले यांनी राजीनामा -

महाविकास आघाडित विधानसभा अध्यक्ष पदावरुन वाद असल्याचे पुढे आले होते. या संदर्भात बोलताना, सर्व सेट झाले असताना नाना पटोले यांनी राजीनामा दिला. मात्र, हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. बाकी काही बदल होणार नाही. जो काही निर्णय घायचा तो तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे भुजबळ यानी यांनी यावेळी सांगितले. इंधनदरवाढीविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्यूत्तर देताना राज्याने टॅक्स कमी करण्यापेक्षा केंद्राने टॅक्स कमी केले पाहिजे, असा टोला भुजबळ यांनी भाजपाला लगावला आहे.

जमीन देणाऱ्या लोकांना जास्तीजास्त मोबदला मिळावा -

सूरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. जिल्ह्यातील 6 तालुके आणि 69 गावातून सूरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग जाईल. जिल्ह्यात 995 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी भूसंपादित करावी लागेल. महाराष्ट्रात नाशिक, नगर आणि सोलापूर या महामार्गाने जोडले जाणार आहेत. जास्तीजास्त मोबदला हा जमीन देणाऱ्या लोकांना मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. 70 ते 75 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. येत्या 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे.

यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याबाबत माहिती नाही -

राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर काल जतमध्ये राज्यपालांना विक्षिप्त म्हणाल्या. हा राज्यपाल पदाचा अवमान आहे. हा प्रश्न उपस्थित केला असता याबाबत मला माहिती नाही. त्यामुळे बोलणे उचित ठरणार नाही, असे भुजबळ यांनी म्हटले.

हेही वाचा - पोक्सोबाबत वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना हटवा, १३ वर्षाच्या मुलीची सरन्यायाधीशांना विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details