महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खेकडे धरण फोडताहेत याची जास्त काळजी करा; थोरातांचा महाजनांना टोला

येत्या विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून 50 च्या वरती सीट आणून दाखवा असे विधान गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये केले होते. याच विधानाला प्रत्युत्तर देत बाळासाहेब थोरात म्हणाले, आमच्या ५० जागाही येणार नाहीत. मात्र असे काही चित्र नसून मागील वेळच्या आकड्यापेक्षा यावेळी आमचा आकडा डबल असेल

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

By

Published : Jul 15, 2019, 8:11 AM IST

Updated : Jul 15, 2019, 8:37 AM IST

नाशिक- महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी किती जागा जिंकणार याचा विचार करण्यापेक्षा खेकडे धरण पोखरत आहेत, त्याची काळजी करावी, असा टोला काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे. ते रविवारी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी बोलत होते. यावेळी नाशकातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात थोरांतांचे स्वागत केले.

येत्या विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून 50 च्या वरती सीट आणून दाखवा असे विधान गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये केले होते. याच विधानाला प्रत्युत्तर देत बाळासाहेब थोरात म्हणाले, आमच्या ५० जागाही येणार नाहीत. मात्र असे काही चित्र नसून मागील वेळच्या आकड्यापेक्षा यावेळी आमचा आकडा डबल असेल, आणि विशेष म्हणजे गिरीश महाजन हे आमचे मित्र आहेत, ते खेळाडू वृत्तीचे आहेत. त्यांनी खेकडे धरणं पोखरताय त्याची काळजी जास्त केली तर त्याचा उपयोग चांगला होईल, असा टोला त्यांनी यावेळी महाजनांना लगावला.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

लोकसभेच्या वेळी राज ठाकरे यांनी मतांची जी काही मांडणी केली होती ती प्रभावी होती. पण त्याचे मतात रुपांतर का झाले नाही, हा विषय वाद विवादाचा विषय होऊ शकतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना सोबत घ्यायचं का नाही, हा वरच्या पातळीचा विषय असल्याचे थोरातांनी सांगितले.

लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक खूप मोठा फरक असतो लोकसभेला निकाल वेगळा लागतो आणि विधानसभेचा निकाल वेगळा लागल्याचे चित्र आपण पाहिजे आहे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बिघडल्यामुळे संपूर्ण भारत देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. राज्यावर पाच लाख कोटी कर्ज झाले असल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला.

Last Updated : Jul 15, 2019, 8:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details