ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे येवल्यात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन - पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅस दरवाढी वीरोधात आंदोलन

पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे येवल्यात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Congress staged agitation in Yeola against petrol, diesel and cooking gas price hike
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे येवल्यात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन
author img

By

Published : Jun 7, 2021, 9:18 PM IST

येवला (नाशिक) - पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅस दरवाढिविरोधात काँग्रेसचे येवल्यात पेट्रोल पंपावर पुष्पहार अर्पण करून आंदोलन केले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाब देऊन अच्छे दिन आले म्हणत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे येवल्यात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध -

केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. पेट्रोलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे. डिझेलचे दरही वाढलेले आहेत. डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकरी अजून अडचणीत आला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही वाढले असून सबसिडी ही मिळत नाही आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे एकनाथ खेमचंद यांच्या पेट्रोल पंपावर गांधीगिरी पद्धतीने पेट्रोल पंपाला पुष्पहार अर्पण करून प्रतिकात्मक पद्धतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा -

पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे पुष्प देऊन अच्छे दिन आले, पेट्रोल- डिझेलची दरवाढ झाली, महागाई वाढली अशी घोषणा देत ग्राहकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

ABOUT THE AUTHOR

...view details