महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगर लोकसभा जागेचा तिढा सुटेना; आघाडीमध्ये तणाव

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून या जागेसाठी काँग्रेसने आग्रह धरू नये असे वक्तव्य केले होते. यानंतर या जागेसाठी आग्रही असलेले काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे.

By

Published : Mar 3, 2019, 7:56 PM IST

राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक - अहमदनगर लोकसभेच्या जागेवरून आघाडीमध्ये सुरू झालेली रस्सीखेच थांबायला तयार नाही. नगर लोकसभेच्या जागेचा तिढा कसा सोडवावा असा प्रश्न आघाडीतील नेत्यांना पडला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून या जागेसाठी काँग्रेसने आग्रह धरू नये असे वक्तव्य केले होते. यानंतर या जागेसाठी आग्रही असलेले काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे.

या जागेवर विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. मात्र, त्यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास ते भाजपचाही पर्याय निवडू शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय हा स्वतंत्र असून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास आपली कुठलीही हरकत नसेल, असे विधान विखे पाटील यांनी केले आहे. विखे पाटील यांच्या या विधानामुळे आघाडीमध्ये या जागेवरून दबाव निर्माण होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details