नाशिक - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर चुंभळे यांना न्यायालयाने शनिवारी पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावर वकिलांनी लागलीच त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी होऊन चुंभळे यांना जामीन मंजूर झाला असल्याचे अॅड. राहुल कासलीवाल यानी सांगितले आहे.
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन मंजूर - अॅड. राहुल कासलीवाल
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर चुंभळे यांना न्यायालयाने शनिवारी पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
चुंभळे यांना पन्नास हजाराच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर झाला आहे. याशिवाय, त्यांना बुधवार आणि गुरुवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान एसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. ही अट दोन महिन्यांचा कालावधीसाठी असणार आहे. तसेच तक्रारदारावर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणण्याची अटदेखील यामध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांच्यातील सत्तासंघर्षातून हे प्रकरण घडल्याची चर्चा नाशिकच्या सहकार क्षेत्रात सुरु आहे. मात्र, या जामीनानंतर शिवाजी चुंभळेंच्या समर्थकांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर, चुंभळे यांनी आपण या प्रकरणातून निर्दोष सुटू असा दावा केला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याे सांगितले आहे. चुंभळे देखील या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणाची सरशी होते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.