नाशिक - पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी ग्रीन ज्युस ही संकल्पना आणली आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुक्तांनी स्वत: बेलपत्र, तुळस, कोथिंबीर, पालक यांची प्रत्येकी पाच ते दहा पाने, दोन आवळे तसेच मीठ यांचे मिक्सरमध्ये मिश्रण तयार करत ज्यूस तयार केला आहे. हा ग्रीन ज्युस रोजच्या आहारात घ्यावा, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांच्या ग्रीन ज्युस संकल्पनेचे कौतुक केले आहे.
यशस्वी संकल्पना
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत कोविडोत्तर व्यवस्थापन प्रबोधन शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोरोना काळात 'ग्रीन ज्युस' ही संकल्पना किती यशस्वी झाली ह्याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लीना बनसोड यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पालकमंत्री भुजबळांकडून पोलीस आयुक्तांच्या ग्रीन ज्युस संकल्पनेचे कौतुक आयुक्त नॅचरोपॅथी अभ्यासक नाशिकच्या पोलीस कोविड सेंटरमधून 198 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे नॅचरोपॅथी अभ्यासक देखील आहेत आणि याचा उपयोग पोलीस दलाच्या सुरक्षेसाठी करत आहेत. आर्थर रोड कारागृहासह राज्यातील कारागृहात आणि पोलीस सेंटरमध्ये ग्रीन ज्युस ही संकल्पना प्रभावीपणे राबवली आणि याचा फायदा बंदिवानांसह पोलिसांना देखील झाला आहे.
काय आहे ग्रीन ज्युस?