नाशिक - नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पाणी कपातीबाबत निर्णय घेणार असल्याचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे. यामुळे कोरोना पाठोपाठ आता नाशिककरांसमोर पाणी कपातीचेही संकट उभे राहणार आहे.
जिल्ह्यातील धरणाता केवळ 38 टक्के पाणीसाठा
मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला. मात्र उन्हाळ्याला सुरुवात झाल्यापासून पाण्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गगापुर, कश्यपी, मुकणे धरणांनी आता तळ गाठला आहे. जिल्ह्यातील 24 धरण समूहांमध्ये आजमितीस 38 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. येत्या दोन दिवसात शहरातील पाणी कपात याबाबत निर्णय घेण्याचे संकेत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 45 टक्केच पाणी शिल्लक
भविष्यामध्ये पावसाळा लांबण्याची शक्यता लक्षात घेता नाशिककरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 45 टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. नाशिककरांना आता कोरोना पाठोपाठ पाणीटंचाईचा देखील सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.