नाशिक - शहरामध्ये पेशवाईत एकूण १६ रहाडी असल्याची नोंद असून आता त्यातील चार रहाडी दरवर्षी खोदल्या जातात. तीन दिवसांपासून रहाडीचे खोदकाम सुरू होते. रंगपंचमी खेळण्याची नाशिककरांची पद्धत ही वेगळीच असून रहाडीमध्ये डुबकी घेत रंग खेळला जातो. गरम पाण्यात नैसर्गिक रंग टाकून तो कालवला जातो. या नंतर तो रंग रहाडीत टाकला जातो. दुपारी २ वाजता राहडीची विधीवत पूजा करून नंतर रहाडीभोवती प्रदक्षिणा मारून बोंब ठोकली जाते आणि रहाडीमध्ये उड्या मारून रंग खेळला जातो.
या रहाडीमध्ये डुबकी मारल्यानंतर पुढचे दोन दिवस तरी रंग अंगावरून उतरत नाही. पंचवटीतील रहाडीचा रंग गुलाबी असतो. गाडगे महाराज पुलाजवळ पिवळा रंग आणि तीवंदा येथे केसरी नारंगी रंग, असे या रहाडी रंगाचेदेखील वैशिष्ट्ये आहे.
नाशिकमध्ये हा रंगाचा उत्सव फक्त रंगपंचमीलाच साजरा केला जातो. नाशिकचे वैशिष्ट्य म्हणजे रहाडीत खेळण्यात येणारी रंगपंचमी. पेशवे हे खरे या रहाडीचे जनक असून ३०० वर्षांपूर्वी दगड आणि चुन्यात या रहाडींचे बाधकाम झाले आहे. नाशिकमध्ये १८ रहाडी अस्तित्वात होत्या. पण आता फक्त ४ रहाडी शिल्लक राहिल्या आहेत.