महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik News : 'त्या' गर्भवती महिलेने वैद्याकडून घेतली होती औषधे, प्रसुती वेदनेमुळे मृत्यू नाही-जिल्हाधिकारी जलज शर्मा - Collector Jalaj Sharma

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडीच्या गर्भवती महिलेने स्थानिक वैद्याकडून औषधोपचार घेतला होता. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनामुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाने दिला असल्याचे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटले आहे. मात्र जिल्हा रुग्णालयाने असा कुठलाच अहवाल दिला नसल्याचे म्हणत, प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे एल्गार संघटनेने म्हटले आहे.

Nashik News
गर्भवती महिलेसह पोटातील बाळाचाही दुर्दैवी अंत

By

Published : Jul 28, 2023, 10:05 PM IST

माहिती देताना भगवान मधे

नाशिक :जुनवणेवाडी येथेएक ते दीड तास पायी चालल्यामुळे गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचाही दुर्दैवी अंत झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर तिचा मृतदेह झोळीतून गावी परत न्यावा लागला होता. याबाबत मुंबईतील पावसाळी अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर यंत्रणेने अहवाल तयार केला. यात महिलेचा मृत्यू हा प्रसूती वेदनेमुळे नसून वैद्याकडून घेतलेल्या औषध उपचाराने व प्रसूतीपूर्वी झटक्यांमुळे झाला आहे. तर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटले आहे. त्या महिलेची प्रसुती तारीख सप्टेंबर महिन्यातील होती. तर आरोग्य केंद्रावर करण्यात आलेल्या यापूर्वीच्या सर्व चाचण्या नॉर्मल असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.



रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवणार : गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर प्रशासकीय यंत्रणा खबडून जागी झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी गावातील रस्त्याची पाहणी केली. या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी साधारण 70 लाख रुपये निधी लागणारा आहे. तर जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे, असे बांधकाम विभागाने सांगितले आहे.



रस्ते अभावीच मृत्यू : महिलेच्या मृत्यूबाबतचा अंतिम वैद्यकीय अहवाल येणे बाकी असताना, महिलेने हॉस्पिटलला जाण्याआधी वैद्याकडून औषध घेतल्याचा दावा जिल्हाधिकारी यांनी केला आहे. आपण कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणत्या माहितीच्या आधारे सदर दावा केला याचादेखील खुलासा करावा. प्रशासन आपली बाजू किंवा आपली चूक झाकण्यासाठी खोटी माहिती पुरवत असल्याचा संशय आहे. याची सखोल चौकशी करावी. आपली दिशाभूल तर कोणी करत नाही ना याचा देखील योग्य तो तपास करून सत्य परिस्थिती शासनास सादर करावी. तसेच महिलेच्या कुटुंबाला न्याय द्यावा. तसेच वाडीला रस्ता कसा लवकर होऊन त्या ठिकाणचे वाडी शहराशी जोडले जाईल यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी एल्गार संघटनेचे पदाधिकारी भगवान मधे यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Nashik Road Issue : झोळीतून दवाखान्यात नेताना गर्भवतीचा मृत्यू, मृतदेह आणतानाही नातेवाईकांची अडीच किलोमीटरची पायपीट
  2. Pregnant Womans Baby Death Bhiwandi रस्त्याअभावी झोळीतून नेताना गर्भवती महिलेचे बाळ झोळीतच दगावले; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भयाण वास्तव
  3. Nashik News ब्लँकेटची झोळी करून गर्भवती महिलेला नेलं रुग्णालयात नाशिकमधील मन सुन्न करणारे दृश्य

ABOUT THE AUTHOR

...view details