नाशिक- मालेगाव-देवळा रस्त्यावर आज सायंकाळी एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आवश्यक औषधोपचार देण्याचेही जिल्हाधिकारी यांना सांगितले. बचाव कार्य अधिक वेगाने व्हावे, यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदत घेण्यात यावी, तसेच मृत व जखमींच्या नातेवाईकांना सर्व आवश्यक साहाय्य करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व ९ डॉक्टर जातीने लक्ष ठेवून आहेत. अपघात झाल्याचे कळताच पाच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून विहिरीत पडलेली बस देखील काढण्यात आली आहे.
नाशिकच्या देवळा येथील अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश - CM Uddhav Thackeray on nashik accident
मालेगाव-देवळा रस्त्यावर आज सायंकाळी एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज सायंकाळी कळवण डेपोची उमराणे - देवळा बस आणि रिक्षा यांचा अपघात होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळली होती.