नाशिक - शिर्डीवरून ठाण्याला परतताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणी अमृता शृंगारपुरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेत गाडीत असलेल्यांपैकी अजय विश्वनाथ करांडे यांचा जागीच मृत्यू झाला असून अमृता शृंगारपुरे आणि इतर जखमी झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणी अमृता शृंगारपुरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या मीना करांडे, मनिषा मिश्रा, अभिषेक सिंग हे झायलो गाडीने शिर्डीवरून देवदर्शनानंतर ठाण्याला परत येत होते. दरम्यान सिन्नर जवळील पांगरी गावाजवळ वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात गाडीत असलेल्यांपैकी विश्वनाथ करांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झाले.