नाशिक - भाजप - सेनेला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या धाग्यांने बांधून ठेवले आहे. युती झाल्याने आघाडीची हालत खराब झाली आहे. त्यांची आघाडी ही महागटबंधन नाही तर महाठकबंधन असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील सभेत केली.
..ते 'महागठबंधन' नाही तर 'महाठकबंधन' - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री
नाशिकमध्ये युतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेते, पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत.
![..ते 'महागठबंधन' नाही तर 'महाठकबंधन' - मुख्यमंत्री](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2719684-317-95c8b1f8-548c-4558-9a3f-31e0530575d3.jpg)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिकमध्ये युतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेते, पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे हे या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण आहेत. युतीच्या संयुक्त मंचावर खडसे प्रथमच आले आहेत.