नाशिक/मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मुंबई आणि मराठी माणसांबाबत केलेले वक्तव्य आक्षेपार्ह ( Governor controversial statement ) असून त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबई आणि महाराष्ट्राच्या उभारणीमधील मराठी माणसाचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे बरोबर नाही मात्र राज्यपालांनी त्यांच्या वक्तव्याबाबत खुलासाही केलेला आहे त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खुलासा केलेला आहे अशी सारवासारवही शिंदे यांनी केली. मुंबईचा योगदानामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचाही मोठा वाटा आहे हे कुणीही विसरू शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिकच्या विभागासाठी जलद योजना राबवणार -नाशिक विभागीय आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव येथील क्रीडा संकुलात पार पडली या बैठकीनंतर पत्रकारांची बोलताना त्यांनी सांगितले की या बैठकीमध्ये नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी सर्व छोट्या कामांच्या रखडलेल्या प्रकल्पांना त्वरित मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. रस्ते वीज आणि पाणी या पायाभूत सुविधांवर आमचा भर असून या भागातील या सुविधा लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील तसेच काही महत्त्वाचे रखडलेले प्रकल्प आहे त्यांनाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन पूर्ण करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.