नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. त्यांनी नुकसानाचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा या गावांना अवकाळीचा फटका : बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे, ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी 8 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, हरभरा, आंबा, गहू, भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश :यावेळीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा रब्बी पिकांचे मोठे नुकसान: नाशिक जिल्ह्यात रविवारी रात्री जोरदार गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा एकदा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बागलाण, नांदगाव, सिन्नर, नांदूर या गावांत रात्री जोरदार मेगगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सिन्नरमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतात 2 इंचा पर्यंत गारांचा खच जमा झाला होता. शेतातील कांदा, मिरची पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा हेही वाचा :Devendra Fadnavis : माझी आई जिथे शिकली ती जागा माझ्यासाठी पवित्र - देवेंद्र फडणवीस