येवला ( नाशिक ) - निसर्ग बदलत असून, हवामान देखील सतत बदलत ( Climate Will Change As Nature Changes ) असल्यामुळे त्यानुसार शेती करणे गरजेचे आहे. 21, 22, 23 मार्च पर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये रात्री बारीक रिमझिम पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डक ( Meteorologist Punjabrao Duck ) यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्याख्यान झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंजाबराव डक म्हणाले की, पृथ्वीचे तापमान वाढत राहिल्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीला सामना करावा लागला. तापमान कमी करण्यासाठी झाडे लावावे लागतील, त्यासाठी सर्वांनी हातभार लावावा लागले. यंदा उन्हाळ्यात तापमान 44 ते 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.