महाराष्ट्र

maharashtra

नाशिक : दुकानांमध्ये 'नो मास्क, नो एन्ट्री'; बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई

सण उत्सवाच्या काळात शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. हे पाहता मास्क न वापरणाऱ्या, सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

By

Published : Nov 3, 2020, 5:01 PM IST

Published : Nov 3, 2020, 5:01 PM IST

दुकानांमध्ये 'नो मास्क, नो एन्ट्री
दुकानांमध्ये 'नो मास्क, नो एन्ट्री

नाशिक- सण-उत्सवच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नाशिक महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील बाजारपेठांमध्ये 'नो मास्क, नो एंट्री' मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, दुकानदार देखील मास्क धारण न केलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देत नसल्याचे बघायला मिळत आहे.

माहिती देताना दुकानदार समाधान महाजन

गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक शहरात झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरीपासून काहीसा नियंत्रणात आल्याचे बघायला मिळत आहे. दिवसाला जवळपास ८०० ते १ हजार रुग्ण आढळणाऱ्या नाशिकमध्ये सद्यस्थितीत दिवसागणिक सुदैवाने १०० ते २०० बाधितांची नोंद होत आहे. तथापि, आगामी सण-उत्सवाच्या काळामध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नाशिक महानगरपालिका प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरात सध्या 'नो मास्क, नो एंट्री' ही मोहीम राबवण्यात येत आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

शहरातील बाजारपेठांमध्ये सण-उत्सवाच्या काळात वाढत असलेली गर्दी पाहता मास्क न वापरणाऱ्या, सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या या मोहिमेला दुकानदार देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत असून, नाशिकची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड भागात दुकानांबाहेर 'नो मास्क, नो एन्ट्रीचे फलक' लावण्यात आले आहेत. तसेच, मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना दुकानदार स्वतःच प्रवेश नाकारत आहेत.

शहरातील १३ पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई

बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी शहरातील पोलीस यंत्रणा देखील रस्त्यावर उतरली असून शहरातील १३ पोलीस ठाण्यांतर्गत ठीक ठिकाणी ही कारवाई केली जात आहे. 'नो मास, नो एन्ट्री' च्या पार्श्वभूमीवर १६० जणांवर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर, ऑक्टोबर महिन्यात १ हजार ४९० नागरिक आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. यात संबंधित नागरिकांवर थेट न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना दंड करण्यात येत आहे.

हेही वाचा-दिवाळी स्पेशल : देशी गायीच्या शेणापासून इको फ्रेंडली रेडिमेड आकर्षक रांगोळ्या

ABOUT THE AUTHOR

...view details