नाशिक - शहरात पेट्रोलचे भाव 92 रुपये 24 पैशावर जाऊन पोहचले असून, याचा सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलचे भाव नियंत्रणात आणून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करत आहे.
नाशिकमध्ये पेट्रोलचे भाव 92 रुपयांवर;नागरिकांमध्ये संताप कोरोना मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून नागरिक सावरत नाहीत, तोच पेट्रोलच्या भावाचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 92 रुपये 24 पैसे लिटर असून स्पीड पेट्रोल साठी नागरीकांना 94 रुपये मोजावे लागतात असल्याने नागरिकांमध्ये सरकार बाबत संताप व्यक्त केला आहे.
कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावून घेतले, उद्योग धंदे देखील अद्याप पूर्वपदावर आले नसल्याने अशा परिस्थितीत घर कसे चालवावे याची नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशात दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
2018 मध्ये पेट्रोल गेले होते 92 रुपयांवर -
सप्टेंबर 2018 मध्ये नाशिक मध्ये पेट्रोलचे भाव 92 रुपयांवर पोहचल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. या नंतर केंद्र सरकारने तातडीनं पावलं उचलत तात्काळ 2 रुपये 50 पैसे प्रति लिटर कर मागे घेत नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारने देखील प्रति लिटर 2 रुपये 50 पैस कर कमी केला होता, त्यामुळे पाच रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाले होते. यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात आला होता. आता ही सरकारने काही प्रमाणात पेट्रोल वरील कर कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.