महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छोटा राजनच्या हस्तकाला नाशिकमधून अटक, गुजरातमध्ये नगरसेवकाची हत्या करून झाला होता फरार - छोटा राजन

आठ महिन्यांपूर्वी गुजरात राज्यातील नाणी दमणमध्ये हत्या करून पसार झालेल्या छोटा राजनच्या हस्तकाला नाशिकच्या गांधीधाम देवळाली गावात अटक करण्यात आली आहे. त्याला गुन्हे शाखा 2 च्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. जयराम लोंढे असे या आरोपीचे नाव आहे.

Rajan accomplice arreste
जयराम लोंढे

By

Published : Oct 27, 2020, 6:42 PM IST

नाशिक -आठ महिन्यांपूर्वी गुजरात राज्यातील नाणी दमणमध्ये हत्या करून पसार झालेल्या छोटा राजनच्या हस्तकाला नाशिकच्या गांधीधाम देवळाली गावात अटक करण्यात आली आहे. त्याला गुन्हे शाखा 2 च्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. जयराम लोंढे असे या आरोपीचे नाव आहे.

(संग्रहित) गुजरात राज्यातील नानी दमन या ठिकाणी दमन महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सलीम मेमन यांची त्यांच्या शोरूममध्ये गोळ्या झाडून हत्या

आठ महिन्यांपूर्वी गुजरात राज्यातील नानी दमन या ठिकाणी दमन महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सलीम मेमन यांची त्यांच्या शोरूममध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान या हत्याकांडातील संशयित आरोपी जयराम लोंढे याला सोमवारी नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. लोंढे हा छोटा राजनचा हस्तक असल्याची माहिती आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details