महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल - Nashik Chitra Wagh News

एरवी छोट्या गोष्टींवर व्यक्त होणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या घटनांची साधी दखल घेतली नाही. क्वारंटाईन सेंटरमध्ये खुलेआम महिलांची छेड काढली जात आहे. या ठिकाणी महिला सुरक्षितेसाठी नियमावली देखील जारी केली नाही. फक्त भाषणांमधून महिला सुरक्षा नको. आपण प्रत्येक क्वारंटाईन सेंटरला भेट देत असून तेथील अवस्था व उपाय योजना याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रा वाघ, भाजप, प्रदेश उपाध्यक्ष
चित्रा वाघ, भाजप, प्रदेश उपाध्यक्ष

By

Published : Aug 14, 2020, 5:50 PM IST

नाशिक -राज्यात मागील काही दिवसात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींचे विनयभंग होत असून सरकार गप्प असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री देशमुख यांनी हा शिव छत्रपतींचा महाराष्ट्र असल्याचे त्यांच्या कृतीतून दाखवावे, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवर आरोप केले. राज्यात महिला सुरक्षा वार्‍यावर आहे. हे सरकार कधी ताळ्यावर येईल, त्याची आम्ही वाट बघतोय. महिला अत्याचाराविरुध्द आणलेल्या 'दिशा' कायद्याची रुपरेषा स्पष्ट नाही. मागील दहा दिवसात अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाच्या घटनेत वाढ होत आहे.

राज्यात महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल
एरवी छोट्या गोष्टींवर व्यक्त होणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या घटनांची साधी दखल घेतली नाही. क्वारंटाईन सेंटरमध्ये खुलेआम महिलांची छेड काढली जात आहे. या ठिकाणी महिला सुरक्षितेसाठी नियमावली देखील जारी केली नाही. फक्त भाषणांमधून महिला सुरक्षा नको. महिला सुरक्षेवर जे घसा कोरडा होईतोवर बोलणार्‍या पक्षांचे आज सरकार सत्तेत असून त्यांनी ते कृतीतून आता दाखवावे, असे त्या म्हणाल्या. आपण प्रत्येक क्वारंटाईन सेंटरला भेट देत असून तेथील अवस्था व उपाय योजना याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details