महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Child Help in Nashik : चालत्या रेल्वेत बाळाची मृत्यूशी झुंज, देवदूतांमुळे वाचले प्राण.. - social worker help in railway in nashik

गीतांजली एक्सप्रेसने ( Gitanjali Express ) कोलकाताहून मुंबईला जाण्यासाठी एक महिला आपल्या 13 महिन्याच्या बाळाला व्हेंटिलेटर ( Baby on ventilator in railway )लावून उपचारासाठी घेऊन जात होती. मात्र ही एक्सप्रेस सात तास उशिराने धावत होती. रेल्वेतील सोबत असलेले तीनही ऑक्सिजन संपल्याने ही घटना मुलाच्या जीवावर बेतणार होती. मात्र अशात नाशिकच्या सामजिक सामजिक कार्यकर्त्यानी मध्यरात्री धावपळ करत ऑक्सिजन सिलेंडर बाळापर्यंत पोहचवल्याने त्याला जीवदान मिळाले असून,या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 5, 2022, 10:48 PM IST

नाशिक : गीतांजली एक्सप्रेसने ( Gitanjali Express ) कोलकाताहून मुंबईला जाण्यासाठी एक महिला आपल्या 13 महिन्याच्या बाळाला व्हेंटिलेटर ( Baby on ventilator in railway )लावून उपचारासाठी घेऊन जात होती. मात्र ही एक्सप्रेस सात तास उशिराने धावत होती. रेल्वेतील सोबत असलेले तीनही ऑक्सिजन संपल्याने ही घटना मुलाच्या जीवावर बेतणार होती. मात्र अशात नाशिकच्या सामजिक कार्यकर्त्यानी मध्यरात्री धावपळ करत ऑक्सिजन सिलेंडर बाळापर्यंत पोहचवल्याने त्याला जीवदान मिळाले असून,या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दाखवत बाळाचे प्राण वाचविले



जळगावातच 2 सिलेंडर संपल्याने महिलेने मागितली मदत - कोलकाताहून मुंबईच्या दिशेने निघालेली गीतांजली एक्सप्रेसने एक महिला आपल्या 13 महिन्याच्या बाळाला व्हेंटिलेटर लावून प्रवास करत होती. मात्र तब्बल सात तास उशिराने ही गाडी धावत होती,आपल्या बाळाला कुठल्याही अडचणीविना सुखरूप कसे नेता येईल या विचारात असताना, सोबत असलेले ऑक्सिजन पुरवठा करणारे तिन्ही सिलेंडर नाशिक पर्यंत देखील पुरणार नव्हते. कारण जळगाव स्थानकावरच दोन सिलेंडर संपले होते. त्यामुळे बाळाचा ऑक्सिजन पुरवठा संपणार हे निश्चित होते. याच काळात महिला रेल्वेतील प्रत्येक व्यक्तीकडे जिवाच्या आकांताने माझ्या बाळाला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत होती. पण कुणीही या महिलेच्या मदतीला धावून येत नव्हते.

डॉक्टरांची मिळाला मदत - याच रेल्वेत डॉक्टर हितेश बुहडे यांनी महिलेचा रडण्याचा आवाज आणि दरवाज्याजवळ सुरू असलेला गोंधळ पाहून त्यांनी माणुसकी दाखवली. स्वतः बाळाची परिस्थिती पाहिली, ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा नाशिकपर्यंत कठीण होता. त्यामुळे बाळाच्या जीवाला धोका होणार होता,डॉक्टर हितेश यांनी याबाबत मदत करायचा लागलीच निर्णय घेतला. एवढ्या रात्री कोण मदत करेल, कमी वेळात गाडी पर्यंत ऑक्सिजन सिलेंडर असे उपलब्ध होईल,असे अनेक प्रश्न असतांना त्यांनी कोरोना काळात अनेकांच्या मदतीला धावून गेलेले सामजिक कार्यकर्ता दीपक डोके यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. डोके यांनी सुद्धा क्षणाचा विलंब न लावता मदतीसाठी तयारी दाखवली.

नाशिकच्या सामजिक कार्यकर्त्यानी मध्यरात्री धावपळ करत ऑक्सिजन सिलेंडर बाळापर्यंत पोहचवल्याने त्याला जीवदान मिळाले

वेळेत पोहचणे होते गरजेचे - मला फोन आला तेव्हा रेल्वे मनमाडवरून निघाली होती. काही वेळातच गाडी नाशिकला येणार होती. माझ्याकडे वेळ कमी होता,मी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधून, सिलेंडरच्या बदल्यात सिलेंडर देण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांनी मला ऑक्सिजन सिलेंडर दिले. मग वेळेत ऑक्सिजन पोहचवण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. ती शिवा गायधनी यांनी उपलब्ध करून दिली,आणि त्यामुळे आम्ही वेळेत बाळापर्यंत ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवू शकलो, याचे समाधान वाटल्याचे सामजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी सांगितले.



मातेचे अश्रू अनावरण - नाशिकच्या देवदूतांमुळे बाळाला वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर मिळाल्याने बाळाची आई हात जोडून अश्रु ढाळत आभार मानत होती. तसेच रेल्वेतील उपस्थित प्रवाशांचे डोळे देखील पाणावले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details