नाशिक:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिर्डीत पोहोचून सपत्नीक साईबाबांच्या दरबारात हजेरी लावून साईंचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, अचानक त्यांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या दिशेने रवाना झाला. मात्र, अचानक बदललेल्या या दौऱ्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. तिथे त्यांनी एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे ज्योतिषाकडे गेले हात दाखवायला? - अंनिस
मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) शिर्डीहून सिन्नरला ज्योतिषाकडे ( astrologer) भविष्य बघायला गेले, अशी चर्चा दबक्या आवाजात महाराष्ट्रात होताना दिसत आहे. यावर अंनिसचे प्रधआन सचिव डॉ.टी.आर गोरणे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
मंदिरात घेतले दर्शन:सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या शिवारात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या या मिरगाव दौऱ्याची अत्यंत गोपनियता ठेवण्यात आली होती. मात्र, माध्यम प्रतिनिधी आणि काही स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री शिंदे हे एका ज्योतिषी बाबाला भेटले आणि त्यांनी त्यांचं भविष्य जाणून घेतले अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मुख्यमंत्री ज्या बाबाला भेटले ते भविष्यवाणी करत असल्याची माहिती आहे. म्हणून मुख्यमंत्री शिर्डीत आले आणि मिरगावात भविष्य पाहायला पोहोचले अशीच ही चर्चा परिसरात होत आहे.
तर चुकीचा संदेश जाईल-अंनिसमुख्यमंत्री शिर्डी दौऱ्यावर आले असताना मिरगांव,सिन्नर येथील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचे समजते आहे. ते खरे असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहिर निषेध महाराष्ट्र अंनिस करत आहे. ज्योतिष हे शास्त्र नसुन थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केल्यास आम्ही एकवीस लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे अस अंनिसने म्हटलं आहे.